महाराष्ट्र हायस्कूल, शांतिनिकेतनची अंतिम फेरीत धडक
schedule10 Jul 24 person by visibility 385 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील विभागीय क्रीडा संकुलातील फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेतील 17 वयोगट मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूल आणि शांतिनिकेतन विद्यालयाने अंतिम फेरीत प्रवेश केला गुरुवारी अकरा रोजी दोन्ही संघात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने शाहू विद्यालय एसएससी 4-0 गोलफरकांनी विजय मिळवला. महाराष्ट्र हायस्कूल कडून प्रतीक पाटील दोन सर्वेश गवळी मयूर सुतार एक गोल केला. उपांत्यपूर्व सामन्यात छत्रपती शाहू सीबीएसईने विद्यापीठ हायस्कूल 2-1 फरकाने विजय मिळवला. शाहू विद्यालय कडून अर्श आजरेकर, श्रेयस ओतारी तर विद्यापीठ कडून मयूर जाधव 1 गोल केला
उपांत्यपूर्वमधील अन्य एका लढतील शांतिनिकेतन स्कूलने देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल 4-1 विजय नोंंदविला. शांतीनिकेतनकडून पियूष सूर्यवंशी, आलोक उबरानी, तनवीर नदाफ समरजीत अपराध एक गोल तर देशमुख इंग्लिश स्कूल करून आयुष पाटील 1 गोल केला.
उपांत्यपूर्व सामन्याच्या लढतीमध्ये पोद्दार स्कूलने महावीर इंग्लिश स्कूल 1-1 असा बरोबरीत राहिला पोद्दारकडून हसन अन्सारी तर महावीर कडून आयुष कनस्कर एक गोल. पोदार स्कूल 3-2 ने ट्राय ब्रेकर वर विजयी केला.
उपांत्य सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने शाहू विद्यालय सीबीएसई 2-0 विजय नोंदविला. महाराष्ट्र हायस्कूल कडून कार्तिक निकम, हर्षवर्धन पाटील 1 गोल केला. उंपात्य सामन्यातील दुसऱ्या लढतीत शांतिनिकेतन स्कूलने पोद्दार स्कूलवर 2-1 असा मिळवला. शांतीनिकेतनकडून अलोक उबराणी आणि सोहम नरसिंघानी तर पोदार कडून हसनैन अन्सारी 1 गोल केला.
...................
गुरुवारचे सामने..
तृतीय क्रमांक सामना :छ. शाहु विद्यालय सीबीएसई वि. पोद्दार स्कूल.
अंतिम सामना : महाराष्ट्र हायस्कूल वि. शांतिनिकेतन स्कुल.