जयप्रभा स्टुडिओत पुन्हा लाइट...कॅमेरा...अॅक्शन ! भालकर फॅमिली पुढे सरसावली !!
schedule03 Oct 24 person by visibility 247 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सिनेेमा निर्मिती, शूटिंग आणि जयप्रभा स्टुडिओ यांच्यामध्ये एक वेगळं नात. कोल्हापूरच्या सिनेसृष्टीचा हा महत्वाचा साक्षीदार. मात्र या ना त्या कारणाने गेले सात वर्षे सुना सुना राहिलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या आवारात पुन्हा एकदा लाइट, कॅमेरा आणि अॅक्शन....हे बोल घुमणार आहेत.
चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशनचे भालकर्स व्हिजन यांची निर्मिती असणाऱ्या ‘करवीरची अंबाबाई’ या भक्तीगीताचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओत होणार आहे. नृत्य दिग्दर्शक संग्राम यशवंत भालकर दिग्दर्शित या या भक्ति गीताचे चित्रीकरण स्टुडिओत करण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. याद्वारे २०१७ नंतर स्टुडिओत पुन्हा चित्रीकरण होईल.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर गाण्याच्या संहितेच आणि क्लॅपचे पुजन जयप्रभाच्या मारूतीच्या पायऱ्यासमोर झाले. याप्रसंगी कलादिग्दर्शक सतीश बिडकर, कॅमेराम्घ्न इम्तियाज बारगीर, निर्माते विजय शिंदे, वेशभुषाकार शाम कांबळे यांच्या हस्ते नारळ वाढवून मुहूर्त करण्यात आला.या प्रसंगी निर्मिती व्यवस्थापक बाळा जाधव, कलादिग्दर्शक अमर मोरे, कलाकार जितेंद्र कांबळे, कॅमेरामन सैफ बारगीर, राहुल जाधव, आकाश लिगाड़े, आशिष हेरवाडकर, बालकलाकार सुफीयान व सुहान बारगीर हजर होते. ‘करवीरची आई अंबाबाई’चे दिग्दर्शक संग्राम यशवंत भालकर यांनी स्वागत केले.
या गाण्याचे चित्रीकरण जयप्रभा स्टुडिओमध्ये सुरू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर मधील जेष्ठ व आघाडीचे कलाकारांचा सहभाग असणार आहे. गीतकार मंदार पाटील तर संगीत दर्शन सुतार यांचे आहे. हे भक्तीगीत करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण करणार आहे असे संदिप यशवंत भालकर व सपना जाधव भालकर यांनी सांगितल