महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्यावतीने भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला . डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. व्ही . एम. पाटील
यांचे हस्ते करण्यात आले . ग्रंथपाल डॉ. आर .पी. आडाव यांनी डॉ .रंगनाथन यांचे चरित्र भारतीय ग्रंथालय व माहितीशास्त्र चळवळीतील त्यांच्या योगदानाची माहिती सांगीतली . यावेळी संस्थेचे आजीव सेवक उदय पाटील , ग्रंथालय समिती सदस्य प्रा. डॉ. विनोद शिंपले , प्रा. के. डी कांबळे , प्रा. ए .ए अष्टेकर, प्रा. अरविंद घोडके , श्री शेखर माने उपस्थित होते .