महिला खो-खो वर्ल्डकप स्पर्धेत कोल्हापूरची कन्या ठरली भारी
schedule29 Jan 25 person by visibility 234 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
दिल्लीत नुकत्याच पहिल्या महिला वर्ल्डकप खो-खो स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत भारतीय संघात कागल तालुक्याीतल करंजीवने येथील कन्या वैष्णवी बजरंग पोवार हिचा समावेश होता. या स्पर्धेत तिने छाप पाडली. भारतासह जगातील २४ देश सहभागी झालेल्या स्पर्धेत हा वर्ल्डकप भारतीय संघाने जिंकला. दरम्यान उंपात्य सामन्यासाठी भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ यांच्यामध्ये जोरदार लढत झाली. या सामन्यामध्ये वैष्णवीला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार मिळाला आहे.
पॉवरलूमच्या व्यवसायानिमित्त वैष्णवी पोवार यांचे कुटुंब इचलकरंजीत चंदुर- शाहूनगर येथे वास्तव्यास आहे. ती इचलकरंजीतील गंगामाई गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावी कला शाखेमध्ये शिकत आहे. भारताच्या संघात एकूण बारा महिला खेळाडूंचा समावेश होता. त्यामधील महाराष्ट्रातील चौघींपैकी वैष्णवी कोल्हापूर जिल्ह्यातून एकमेव आहे.
………………………
मंत्र्यांनी केले अभिनंदन, जंगी सत्कारही होणार
जागतिक पातळीवरील यशाबद्दल वैष्णवी पोवार हिचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘ वैष्णवी, तुझ्या या यशाचा आम्हा समस्त कोल्हापूर जिल्ह्यासह भारतवासीयांना सार्थ अभिमान आहे. खेळाडू म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सर्वजण उभे आहोत. अजूनही यशाचा फार मोठा पल्ला तुला गाठायचा आहे. वैष्णवी कोल्हापुरात येताच तिचा जाहीर सत्कार करणार आहे.’