कोल्हापूर-गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला
schedule29 Jul 24 person by visibility 408 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पूरस्थितीमुळे गेले काही दिवस बंद असलेला कोल्हापूर-बालिंगे-कळे-साळवण-ते गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.२, कोल्हापुर या विभागाच्या अखत्यारित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ जी (कोल्हापूर-बालींगे-कळे-साळवन-ते गगनबावडा) या रस्त्याच्या किमी ७९/५०० बालींगे - भोगावती नदीवरील अस्तित्वातील जुन्या दगडी कमानी पुला खालून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीच्या खाली आली असल्यामुळे हा पुल वाहतुकीसाठी सुरु करण्यात आल्याची माहिती उप अभियंता आर.बी.शिंदे यांनी सोमवारी (२९ जुलै ) दिली आहे.