Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफपदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत वाद, शिवसेना ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर हल्लाबोल ! ठाकरेंचे फोटो वापरल्यास कायदेशीर कारवाई ! !सत्तेचा घटक असतानाही शिक्षकांसाठी भांडलो, महाविकास आघाडीच्या कालावधीत जयंत आसगावकरांनी कुठले प्रश्न सोडवले ? कौस्तुभ गावडेंचा सवालकेआयटीच्या २६ विद्यार्थ्यांना टाटा पॉवरमध्ये ७ लाखांचे पॅकेजना रस्ते - ना गटारसाठी, आमदार फंडाचा निधी शाळांसाठी ! पाच जिल्ह्यातील शाळांना सात हजाराहून अधिक शैक्षणिक साहित्य वाटप ! !पदवीधरसाठी शिवसेना ठाकरे पक्षाचा आज प्रचार मेळावा

जाहिरात

 

कौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! !

schedule16 Oct 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,  : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा-महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रचाराला गती दिली आहे. माळशिरस येथे आयोजित भाजपा-महायुतीच्या प्रचारसभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेच्या माध्यमातून कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक, पदवीधर मतदार आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने महायुतीची एकजूट आणि समन्वयाचे चित्र या सभेतून समोर आले.

माळशिरस येथील या प्रचारसभेला माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, रावेरचे आमदार अमोल जावळे, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, भाजपाचे ज्येष्ठ नेते सोपान नारनवर, भाजपा वरिष्ठ नेते अमरसिंह माने देशमुख, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष शरद मदने, अकलूज मंडळ अध्यक्ष सुजयभैय्या माने पाटील, माळशिरस मंडळ अध्यक्ष नितीन मोहिते, पिलीव मंडळ अध्यक्ष संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, नातेपुतेचे नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, भाजपा पदाधिकारी सचिन शिंदे, शिवसेना नेते राजकुमार हिवरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर ग्रामीण अध्यक्ष अक्षय भांड, धनगर कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हनुमंतराव सूल, पंचायत समिती सदस्य राहुल रुपनवर, आनंद शेंडगे आणि नम्रता शिवराज पोकळे उपस्थित होते.

प्रचारसभेबरोबरच कौस्तुभ गावडे यांनी माळशिरस येथील शैक्षणिक संस्थांनाही भेट देत शिक्षकांशी थेट संवाद साधला. श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्था संचलित गोपाळराव देव प्रशाला व ज. चं. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय तसेच मारुतीनाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय व पूर्व प्राथमिक विभाग येथे त्यांनी भेट दिली. या वेळी शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, शिक्षकांसमोरील विविध आव्हाने, प्रलंबित प्रश्न आणि शिक्षकांच्या अपेक्षा यांवर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान संस्थेचे संचालक संतोष पांडुरंग कुलकर्णी, प्राचार्य सूर्यकांत सिद्राम जानकर उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि शिक्षणव्यवस्थेच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्दे केंद्रस्थानी ठेवण्याच्या दृष्टीने कौस्तुभ गावडे यांनी संस्थाभेटी आणि जनसंवादावर भर दिला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes