कळंबा तलाव ओव्हरफ्लो, सांडव्यावरुन पाणी वाहू लागले
schedule24 Jul 24 person by visibility 686 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाचगाव आणि कळंबा गावासाठी वरदायिनी असलेला कळंबा तलाव पाण्यांनी भरला आहे. गेले काही दिवस पावसाची संततधार सुरू होती. आसपासच्या भागातील पाण्याचे प्रवाह तलावात येऊन मिसळतात. कात्यायनी डोंगरातून वाहणारे नाले हे मुख्य पाण्याचे स्त्रोत आहेत. कळंबा तलावातील पाण्याची पातळी २७ फुटावर गेली की सांडव्यावरुन पाणी वाहू लागते. बुधवारी, (२४ जुलै २०२४) कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला. सकाळपासूनच सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.