+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई adjustपाचगाव, कळंबा, गांधीनगरसह सात ग्रामपंचायतींना नोटीसा adjust विधायक उपक्रमांनी प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस साजरा adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule03 May 24 person by visibility 77 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
कोल्हापूर विभागातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हद्वारे ४८ विद्यार्थ्यान विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. 
 डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  या ड्राईव्हचे आयोजन केले होते. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डी. वाय. पाटील फार्मसीचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. कोल्हापूर, बेळगाव, सांगली कराड, बार्शी व सोलापूर येथून सुमारे १३४ विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदविली होती.  
 डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या ११ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता व त्यापैकी 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हसाठी गोवा मधून झायडस कॅडीला, युनिकेम लॅब, मुंबई मधून वेलनेस फॉरेवर, जेनेरीकार्ट, आर्डेंट क्लिनल, ग्रुप फार्मा या नामांकित कंपन्यांनी उपस्थिती लावली होती. प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे व तसेच सिरी एज्युटेक तर्फे सचिन कुंभोजे, विश्वजीत काशीद आणि प्रद्युम्न मगदुम यांचे मार्गदर्शन लाभले  
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.