+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule03 Sep 24 person by visibility 661 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :- कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील विकासवाडी गावाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यातील १२ हेक्टर जागा क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  दिले. या जागेवर स्टेडिअम उभारण्यासाठी लागणारा खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार असून क्रीडा विभागाने त्यांच्याशी करार करावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. 
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला क्रीडांगण उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री  पवार यांनी त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली. बैठकीस पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार तथा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, बाळ पाटणकर , महसूल  विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.  पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाने विकासवाडी येथे त्यांच्या ताब्यात असलेल्या गट क्रमांक ११० व १११ मधील १२ हेक्टर जागेसंदर्भातील डी-नोटिफिकेशन त्वरित काढावे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी या जागेबाबतचा अहवाल तातडीने संबंधित विभागांकडे पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली.