+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे adjust बदलीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणूक विभागाशी पत्रव्यवहार adjustग्रामसेवकांच्या विरोधात सीईओंच्याकडे तक्रारी adjustकेआयटी रेडी इंजिनियरमध्ये राष्ट्रीय स्तरावर अव्वल adjustप्रा.ऋतुराज कुळदीप यांच्या पुस्तकाचे प्रकाशन adjustख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर मनोरंजननगरी, माशांच्या नानाविध जाती ! adjustडीवाय पाटील फार्मसीत जी पॅट परीक्षेबाबत मार्गदर्शन adjustआचारसंहितेमुळे शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक ! शिक्षक संघाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट adjustजिल्हा परिषदेत ई-ऑफिस प्रणाली ! फायलींचा प्रवास-दिरंगाई समोर येणार !!
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule31 Oct 23 person by visibility 189 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधनाचा वापर सर्वसामान्यासाठी व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. नव्याने सुरू होत असलेले ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी' केंद्र वैज्ञानिक ज्ञान समाजापर्यंत पोहचविण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री डी. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये  ‘डी. वाय. पाटील सेन्टर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलीटी’चा शुभारंभ कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाला. रिसर्च डायरेक्टर डॉ. प्रा. सी. डी. लोखंडे यांनी प्रास्तविकामध्ये गेल्या काही वर्षामध्ये विद्यापीठाने संशोधनामध्ये घेतलेली झेप व विभागाच्या इतर उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
  संशोधक डॉ. जयवंत गुंजकर यांनी केंद्राच्या उद्देशांची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक शिक्षणाची गोडी निर्माण करणे, देशभरातील संशोधकांना एकत्र आणून सुसंवाद साधणे, वैज्ञानिक क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान समाजातील प्रत्येक घटकापर्यत पोहचविणे हा उद्देश आहे. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल,   विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलसचिव डॉ.  व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.  राकेश शर्मा,  उपकुलसचिव संजय जाधव, डॉ. मेघनाद जोशी आदी उपस्थित होते.
.