Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

कोल्हापूरात चार ऑगस्टला राज्यव्यापी परिषद, बाजार समितीच्या सेस विरोधात आंदोलनाची दिशा ठरणार

schedule09 Jul 26 person by visibility 268 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरात ४ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी परिषद घेण्याचे ठरविण्यात आले. दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशनच्या सभागृहात मार्केट सेस रद्द करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांनी सुरुवातीस कृषी उत्पन्न बाजार समिती सेस विरोधातील लढा एकसंघपणे लढण्यासाठी कोल्हापूर चेंबरने नेहमीच मदत केली असून आता आरपारची लढाई होणेसाठी राज्यव्यापी परिषद कोल्हापूरात घेणे आवश्यक असून त्यासाठी कोल्हापूर चेंबरने पुढाकार घेत राज्यातील संघटनांना एकत्र आणावे अशी मागणी केली.

कोल्हापूर चेंबर व कॅमिटचे सचिव अजित कोठारी यांनी, ‘कृषी उत्पन्न बाजार समिती रद्द होणेबाबत कॅमिट या राज्यस्तरीय संघटनेने गेल्या पंधरा दिवसांत ४ ऑनलाईन बैठका घेतल्या होत्या. या बैठकीस कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बारामती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, वाशी, चंद्रपूर, नवी मुंबई, अकोला व राज्यातील अनेक बाजार समिती सेस संबंधित व्यापारी उपस्थित होते. एलबीटी प्रमाणे मार्केट सेस रद्द होणेसाठी कोल्हापूर चेंबर व कॅमिट तर्फे पूर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली. किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कापडिया यांनी मार्केट सेसचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून फक्त मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांनी आंदोलनात सहभागी न होता इतर व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष व कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी अध्यक्षीय भाषणात मार्केट सेस रद्द होणेबाबत कोल्हापूर चेंबर सुरुवातीपासून संबंधित व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून दुबार कर आकारणीला कायमच विरोध राहील असे सांगितले. ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्रातील सर्व व्यापारी संघटनांची राज्यव्यापी परिषद आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या परिषदेमध्ये राज्यभरातील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी सहभागी होऊन मार्केट सेस रद्द होणेबाबत पुढील आंदोलनाची दिशा व भूमिका निश्चित करतील असेही त्यांनी सांगितले.  कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुमार अहुजा, दि शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो पाटील, रवा मैदा असोसिएशनचे अमोल नष्टे यांची देखील भाषणे झाली. यावेळी वैभव सावर्डेकर, विजय कागले, सुरेश लिंबेकर, विवेक शेटे, श्रीनिवास मिठारी, किरण तपकीरे, अमर क्षीरसागर, संतोष लाड, अभयकुमार अथणे, विवेक नष्टे, अतुल शहा, प्रवीण लिगाडे, शंकर सचदेव, सुंदर पोपटाणी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes