भाजपातर्फे बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी
schedule21 Jul 24 person by visibility 477 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजीच्या वाढदिवसानिमित्त भाजपा बांधकाम कामगार आघाडी कोल्हापूरच्या वतीने आरोग्य शिबीर झाले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या शिबिरात बांधकाम कामगारांना कार्ड वितरण केले.
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. बांधकाम कामगार आघाडी अध्यक्ष संजय पाटील यांनी बांधकाम कामगारांच्या योजनांची माहिती दिली. आरोग्य शिबिरामध्ये जवळपास १५० हून अधिक नागरिक, बांधकाम कामगारांनी आरोग्य तपासणी करून घेतली तसेच या आरोग्य शिबिराला हिंद ब्लड लॅबचे सहकार्य लाभले. यावेळी अमर साठे, रविकिरण गवळी, प्रदीप उलपे, अमित टिकले, सचिन पाटील, सचिन पाटील-शाहूवाडीकर उपस्थित होते.