हाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
schedule20 Jun 25 person by visibility 39 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हाज यात्रेवरुन पत्करलेल्या यात्रेकरुंचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूर, बेळगाव, सांगली, कोकणातील मिळून ४० यात्रेकरु कोल्हापुरात दाखल झाले. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कोल्हापूर हाज कार्पोरेशन अध्यक्ष इस्माईल मकानदार, मुस्ताक मकानदार, कादर मलबारी, चांद जत्राटे, समीर जमादार, अजीम फुलवाले, समाधान हेगडकर यांनी कोल्हापुरी पेढा भरवित यात्रेकरुंचे स्वागत केले. हे यात्रेकरु विमानाने हैदराबादला आले, तेथून कोल्हापूरला परतले. हवाई वाहतूक सेवेमुळे प्रवास जलद झाल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. हे यात्रेकरु सौदी अरब मदिनामधून हैदराबादमार्गे कोल्हापूरला पोहोचले.