Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागतजिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखलजरगनगर विद्यामंदिर बनली हायटेक शाळा, अत्याधुनिक लॅबची राज्यात महापालिकेची पहिलीच शाळाजिप अध्यक्ष - उपाध्यक्षांची नावे निश्चित ! शिल्पा खोत, तानाजी पाटलांना संधी! जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कार

जाहिरात

 

पालकमंत्र्यांनी केले जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन 

schedule21 Apr 25 person by visibility 937 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून जलद कार्यवाही होत असल्याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाचे  अभिनंदन केले. ३१ डिसेंबर अखेर अनुकंपा प्रतीक्षासूचीमध्ये ३१ उमेदवारांना त्यांचे शैक्षणिक अर्हता व जात प्रवर्गनुसार उपलब्ध असलेल्या गट क किंवा ड पदावर नियुक्ती देण्यात आली. पालकमंत्री  आबिटकर यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई उपस्थित होते.

 सरकारी यंत्रणेत चांगल्या पध्दतीने मेहनतीने आणि जबाबदारीने काम करुन लोकांचे उत्तरदायित्व स्विकारा असे आवाहन  पालकमंत्री  आबिटकर यांनी केले. एमपीएसीमार्फत निवड होण्यासाठी मुलं चार-पाच वर्ष अभ्यास करतात. पण त्यापैकी चार-पाच हजार मुलांचीच निवड होते. आता मर्यादित मुलांनाच नोकरी मिळत आहे. तुम्हाला एखाद्या दुर्देवी घटनेनंतर नोकरी मिळाली, नोकरी मिळाल्यानंतर शासकीय यंत्रणेचा फायदा करुन घेऊन मेहनतीने काम करा. नोकरी लागल्यानंतर रिटायर्ड होईपर्यंत या नोकरीच्या माध्यमातून गरजूंना मदत करा, लोकांचे प्रश्न सोडवा आणि आपली सेवा चांगल्या प्रकारे बजावा, असे आवाहन त्यांनी उपस्थितीतांना केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात समृद्धी मुळे, ओमकार दिवेकर, मुदस्सीर खान या नियुक्ती दिलेल्या उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes