पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते कल्याणकारी योजनांच्या चित्ररथाचे उद्घाटन
schedule16 Mar 25 person by visibility 118 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रचार प्रसिध्दी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हा चित्ररथ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे .जिल्ह्यातील जवळपास 220 गावात या चित्ररथाद्वारे कल्याणकारी शासकीय योजनांची प्रचार प्रसिध्दी केली जाणार आहे. या चित्ररथावर विविध शासकीय योजनांचे फलक, तसेच शासकीय योजनांच्या ध्वनीफितीच्या (जिंगल्स) माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून त्यांना या योजनांची माहिती दिली जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदी उपस्थित होते. यानंतर हा चित्ररथ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी मार्गस्थ झाला.