नाइट कॉलेजची लख्ख कामगिरी, जयप्रभा चव्हाण विद्याीठात मराठी विषयात प्रथम
schedule03 Oct 24 person by visibility 187 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठातर्फे एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या एमएच्या परीक्षेत मराठी विषयामध्ये नाइट कॉलेजची विद्यार्थिनी जयप्रभा गणपती चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिने ७६.६५ टक्के गुण मिळवून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तसेच वेला अशोक खाडे या विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दहाव्या आल्या असून त्यांना ७२.२५ टक्के गुण संपादन केले आहेत.
या दोघीही विद्यार्थिनींनी दिवसा नोकरी करून नाइट कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत अग्रस्थानी येण्याची देदीप्यमान कामगिरी केली आहे . त्यांनी ध्येयवादाचा, कष्ट करून शिकण्याचा, जिद्दीचा, गुणवत्तेचा इतिहास घडवीत महाविद्यालयाचा लौकिक उंचावला आहे, याबद्दल त्यांचे कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, उपाध्यक्ष डॉ . प्रसाद मगदूम, संचालक अँड वैभव पेडणेकर, अँड अमित बाडकर, प्रभारी प्राचार्य डॉ एस जे फराकटे यांनी अभिनंदन केले . त्यांना मराठी विभाग प्रमुख प्रा . डॉ अरुण शिंदे व डॉ . नंदकुमार कुंभार यांनी मार्गदर्शन केले