+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule24 Sep 24 person by visibility 704 categoryमहानगरपालिका
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  कोल्हापूर शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त  के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना पाणी कनेक्शनसाठी प्रति मीटर ६५०० रुपये खुदाई खर्च म्हणून भरावे लागत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. हा खर्च कमी करण्याची मागणी माजी आमदार महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली. 
  या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी हा खर्च १००० रुपये प्रति मीटर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे पाणी कनेक्शनसाठी येणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. शिवाय कोल्हापूर शहरातील कचऱ्याच्या समस्येवरही या बैठकीत चर्चा झाली. महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्यास सरकारकडे यंत्रसामग्री आणि मनुष्यबळासाठी निधीची मागणी करावी. आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करून आणू अशी ग्वाही माजी आमदार महाडिक यांनी दिली. 
 टेंबलाईवाडी येथील क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित करणे, टाकाळा येथील आशा कॉलनी झोपडपट्टी नियमित करणे, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या महापालिका प्रभागांमध्ये ड्रेनेज व गॅस पाईपलाईनची कामे सुरू करणे, सुभाष नगर येथील सरकारी शौचालय पाडणे, सुभाष नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे हॉल बांधण्यासाठी ना हरकत पत्र देणे, कोल्हापूर शहरातील सिग्नल व्यवस्थेबाबत शहर वाहतूक शाखेसोबत समन्वय राखणे, राजेंद्र नगर, यादव नगर मधील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या वापरातील जागा मालकी हक्काने देणे, जवाहर नगर बिजली चौक परिसरातील रहिवाशांचे प्रॉपर्टी कार्ड बनवणे, उपनगरांमधील नवीन क्रीडांगण प्रस्तावांबाबत उपसमितीची बैठक घेणे, हॉकी स्टेडियम मधील प्रलंबित कामे पूर्ण करणे, शिंगणापूर बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे, राजेंद्र नगर येथे अमृत योजनेसाठी वीज कनेक्शन उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर आयुक्तांसोबत चर्चा झाली.  यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, प्रा.जयंत पाटील, आशिष ढवळे,आप्पा लाड यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.