खासदार धनंजय महाडिकांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलला भेटवस्तू वाटप
schedule27 Jan 25 person by visibility 169 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना अन्नधान्य, कपडे आणि इतर भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.अंजली विश्वराज महाडिक यांच्या हस्ते संस्थेला दोन लाख रुपयांचे अन्नधान्य, कपडे आणि आवश्यक साहित्य देण्यात आले.
कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या बालकल्याण संकुलात, अनाथ मुले, अल्पवयीन गुन्हेगार, अल्पवयीन मुली, चाळीस वर्षापर्यंतच्या विधवा, बेवारस महिला यांना आश्रय दिला जातो. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. अनेक दानशुरांच्या मदतीवर या संस्थेचे कार्य सुरू आहे. खासदार महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष उपक्रम राबवला. संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विश्वस्त पद्मा तिवले यांनी स्वागत केले. विभाग प्रमुख तुकाराम कदम, मीना भाले, परीविक्षा अधिकारी सचिन माने यांनी बालकल्याण संकुलाच्या वाटचालीबद्दल माहिती दिली.
यावेळी अनाथ मुलांसह पीडित- निराधार महिलांना आधार देण्याचे काम प्रामाणिकपणे केले जात आहे. या संस्थेचे विश्वस्त आणि कर्मचार्यांकडून खर्या अर्थानं मानवतेची सेवा होत असल्याचे महाडिक यांनी बोलून दाखवले. भविष्यात नेहमीच या संकुलासाठी महाडिक परिवाराचं सहकार्य असेल, असे त्यांनी आश्वासन दिले.