कोल्हापुरात रविवारी जीपीकॉन - २०२५ वैद्यकीय परिषद
schedule16 Jan 25 person by visibility 396 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांच्या अंतरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीपीकॉन २०२५ –ग्रॅस्ट्रोकॉन’ही वैद्यकीय परिषद रविवारी, (१९ जानेवारी २०२५) होत आहे. अयोध्या हॉटेलमधील वृंदावन लॉन येथे सकाळी ११ वाजता या परिषदेला सुरुवात होईल. या परिषदेस कोल्हापूर परिक्षेत्रातील ५०० हून अधिक डॉक्टर सहभागी होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे व सचिव डॉ. महादेव जोगदंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेत पोटविकारतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पोटविकाराबाबत निदान, आधुनिक तपासण्या, आधुनिक उपचार पद्धती, पोटविकार शस्त्रक्रिया, पोटविकार भूल याविषयासंबंधी माहिती दिली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिक व प्रत्येक डॉक्टराला उपयुक्त् अशी ‘बेसिक लाइफ सपोर्ट –जीवन संजीवनी’ या विषयी परिसंवाद आहे. या परिषदेला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, प्रसिद्ध हृदय शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. एम. डी. दिक्षीत हे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेत वैद्यकीय व इतर विषयावरील पोस्टर प्रदर्शन आहे. परिषदेत रात्री जनरल प्रॅक्टिशनर्स संघटना सदस्य हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे खजानिस डॉ. गुणाजी नलवडे, डॉ. प्रशांत खुटाळे, डॉ. पूजा पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. हरिष नांगरे, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. विनोद घोडके आदी उपस्थित होते.