Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्तेजागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कागलमध्ये जनसेवा सप्ताहतंर्गत उपक्रमकोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापक- शिक्षकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठगोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीमसोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमलेकोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!

जाहिरात

 

फुटबॉलच्या मैदानातही नगरसेवकच ठरले भारी, अधिकारी संघावर ३-२ गोलफरकांनी विजय

schedule16 May 26 person by visibility 438 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रशासकीय कामकाज व विकासकामांवरुन कधी एकमेकांसोबत तर कधी एकमेकांविरोधात उभे ठाकणारे महापालिकेचे नगरसेवक आणि अधिकारी हे शुक्रवारी फुटबॉलच्या मैदानात उतरले. महापौर चषक फुटबॉल स्पर्धेचे औचित्य साधून शनिवारी, सोळा मे २०२६ रोजी नगरसेवक व अधिकाऱ्यांच्यामध्ये प्रदर्शनीय फुटबॉल सामना झाला. महापौर इलेव्हन व कमिशनर इलेव्हन या नावांनी खेळलेल्या या सामन्यात नगरसेवकांच्या संघांने अधिकारी संघावर तीन विरुद्ध दोन अशा गोलफरकांनी विजय मिळवला.

येथील छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर हा सामना झाला. २५ मिनिटाचा हा सामना होता. महापौर इलेव्हन संघात उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक विजय खाडे, राहूल माने, स्वरुप कदम, वैभव माने, नियाज खान, आश्किन आजरेकर, अभय तेंडुलकर, करण जाधव, निखिल कोराणे, प्रसाद उगवे, प्रसाद जाधव हे फुटबॉलपटून म्हणून मैदानात उतरले. नगरसेवक संजय मोहिते हे गोलकिपर होते. कमिशनर इलेव्हन संघात महापालिकेतील अधिकारी पारितोष कंकाळ, किरणकुमार धनवडे, सुनील बिदरी, संजय सरनाईक, राम काटकर, राजेंद्र दळवी, अभिजीत सरनाईक, चंद्रकांत पाटील, निखील काळे, सुनील पोवार, रवी पोवार, सचिन इंगवले यांचा समावेश होता. महापौर इलेव्हन संघातील काही नगरसेवकांनी यापूर्वी फुटबॉलपटून म्हणून सामने खेळले होते. यामुळे हा संघ वरचढ ठरत होता. दुसरीकडे कमिशनर इलेव्हन संघात खेळणाऱ्या अधिकाऱ्यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन घडविले. चांगल्या खेळाचे दर्शन घडवत सामना जिंकण्याचाही प्रयत्न केला.

मात्र खेळातील हार -जीत पेक्षा या प्रदर्शनीय सामन्याचा दोन्ही संघांनी आनंद लुटला. महापौर इलेव्हनकडून पहिल्या गोलची नोंद उपमहापौर अक्षय जरग यांनी केली. प्रसाद उगवे, करण जाधव यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाची गोलसंख्या तीन केली. कमिशनर इलेव्हनकडून खेळताना निखील काळे व सुनील पोवार यांनी गोल नोंदवित आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेर हा सामना महापौर इलेव्हन संघाने तीन विरुद्ध दोन अशा गोलफरकांनी जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर महापौर इलेव्हन संघातील नगरसेवक खेळाडूंनी हात उंचावून फेर धरत जल्लोष केला. या जल्लोषामध्ये स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे सुद्धा सहभागी झाले.  दुसरा प्रदर्शनीय सामना कोल्हापूर पोलिस संघ विरुद्ध कोल्हापूर महापालिका संघ यांच्यामध्ये झाला. हा सामना कोल्हापूर महापालिका संघाने तीन विरुद्ध दोन अशा गोलफरकांनी जिंकला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes