Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनग्रामपंचायतीकडूनच अपार्टमेंटमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन ! राजू मानेंचा आरोप,  आंदोलनाचा दिला इशारा !!गोकुळ निवडणूक- सतेज पाटलांचा धडाका, भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेटजिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा - सदस्यांची अध्यक्षांच्याकडे मागणीनरेंद्र मोदी विचारमंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पूनम तोडकरजुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलनभरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड

जाहिरात

 

शिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहिती

schedule27 Aug 26 person by visibility 95 categoryजिल्हा परिषद

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक राजवटीतील प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचा लेखाजोखा होणार आहे. प्राथमिक शिक्षण समितीने, या संदर्भातील माहिती शिक्षण विभागाकडे मागितले आहे एकूण नऊ मुद्द्यांच्या अनुषंगाने ही माहिती सादर करावी अशी स्पष्ट सूचना प्राथमिक शिक्षण समिती सभापती शितल यादव यांनी शिक्षण विभागाला केले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये जवळपास चार वर्षे प्रशासक राजवट होती या कालावधीतील शिक्षकांच्या नियुक्त्या, प्रतिनियुक्त्या यासह विविध योजनांची माहिती सादर करावी अशी स्पष्ट सूचना त्यांनी केले आहेत. जिल्हा परिषदेचे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचा  पंचनामा केला होता. शिक्षण विभागाच्या कामकाजासंबंधी विविध तक्रारी प्राप्त झाले आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने माहिती सादर करावी असेही शिक्षण विभागाला कळवले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes