Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष - वंचित - आप एकत्र ! 21 उमेदवारांची घोषणा, 81 जागा लढणार !! अभ्यासूवृत्तीला समाजकार्याची जोड, लोकांच्या प्रश्नाविषयी तळमळपीआरएसआय कार्यकारी समितीवर विवेक सिद्ध यांची निवडडीवाय पाटील आर्किटेक्चरच्या सिल्व्हर ज्युबिली बॅच विद्यार्थ्यांची महाविद्यालयास भेटप्रजासत्ताक दिन परेड शिबिरासाठी कोल्हापुरातील अकरा एनसीसी विद्यार्थ्यांची निवड शिवाजी विद्यापीठात होणार संत साहित्य संमेलनकृष्णराजनी भरला उमेदवारी अर्ज, महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात !!शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नैसर्गिक शेती मिशन कार्यक्रमकोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सची कार्यकारिणी जाहीरपाचगावमधील होम मिनिस्टर स्पर्धेत शुभांगी गाडगीळ विजेत्या

जाहिरात

 

डॉ. प्रकाश संघवी यांना जीवनगौरव पुरस्कार

schedule27 Oct 24 person by visibility 527 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या चार दशकांहून अधिक काळ वैद्यकीय सेवेत कार्यरत  प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांना नुकतेच जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या महापेडीकॉन आय. ए. पी वैद्यकीय परिषदेत डॉ. संघवी यांचा हा सन्मान झाला 
  महा पेडीकॉन आय.ए.पी या संस्थेतर्फे आयोजित या वैद्यकीय परिषदेला दीड हजार नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. या परिषदेत  संघवी यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. पद्म् पुरस्कार प्राप्त डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संघवी  यांना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. 
 ‘आपण निरपेक्ष आणि सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय क्षेत्रात यापुढेही कार्यरत राहून नवजात शिशूंची सेवा करणार आहे.  जीवनगौरव पुरस्काराने आपली जबाबदारी आता अधिकच वाढली आहे.’अशा भावना डॉ. संघवी यांनी व्यक्त केल्या. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes