+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागर धावले पूरग्रस्तांच्या भेटीला, भर पावसात विविध ठिकाणांची पाहणी adjustकाँग्रेसकडून सतेज पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी ! समन्वय समितीत स्थान ! adjustजयंती नाल्यावर पाणी, वाहतुकीसाठी मार्ग बंद adjust४०९ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी ! सीईओंनी शब्द पाळला, शिक्षणाधिकाऱ्यांचे गतीमान कामकाज !! adjustपावसाचा रपाटा- पाण्याचा विळखा कायम ! घरांची पडझड, नागरिकांचे स्थलांतर!! adjustकास्ट्राइब शिक्षक संघटना कोल्हापूरतर्फे आरक्षण दिन साजरा adjustपूरग्रस्त कुंभार समाजाच्या मदतीसाठी भाजपाची जिल्हा प्रशासनाकडे धाव adjustभारतीय मजदूर संघाचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा adjustजबाबदारीने पेलतेय तरुण पिढी शिक्षण संस्थांची कामगिरी adjustदेवराज बोटिंग क्लबने रंकाळा तलावातील कचरा हटविला
1000653813
1000630884
1000621806
1000615695
schedule02 May 23 person by visibility 328 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
दक्षिण भारत दिगंबर कासार जैन संस्थेमार्फत सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला मेळाव्यात डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या सहयोगी प्रा. डॉ. केतकी धने यांचा कर्तबगार महिला म्हणून सन्मान करण्यात आला. डॉ. धने यांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ समाजसेवक विजय आण्णासो कासार यांच्या हस्ते  पुरस्काराने गौरविण्यात आले.शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. केतकी धने या मागील बारा वर्षे शैक्षणिक व संशोधनात्मक कार्यामध्ये सक्रिय आहेत. 2023 मध्ये जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. डायबिटीस, हृदयरोग, स्थूलपणा, सांधेदुखी अशा आजारावर नवनवीन आयुर्वेदिक औषधांचा वापर हा त्यांच्या संशोधनाचा गाभा आहे. आत्तापर्यंत जवळपास 15 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल प्रोफेशनलच्यावतीने आयोजित 22व्या इंडो युनायटेड स्टेट जागतिक परिसंवादामध्ये प्रथम क्रमांक तर फार्मासिटिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने नागपूरमध्ये झालेल्या परिसंवादामध्ये संशोधनासाठी तिसऱ्या क्रमांकाचे नामांकन मिळाले होते. नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ पुणे यांच्यावतीने वूमन प्राईड या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. 
डॉ. धने यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी अभिनंदन केले.