+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई adjustपाचगाव, कळंबा, गांधीनगरसह सात ग्रामपंचायतींना नोटीसा adjust विधायक उपक्रमांनी प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस साजरा adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule01 May 24 person by visibility 103 categoryउद्योग
गोकुळमध्ये कामगार दिन साजरा  
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात ख्याती असलेला  दूध संघ असून गोकुळचे शेतीपूरक, दुग्ध व्यवसायातील कार्य तसेच दूध संकलन, दुग्ध प्रक्रिया व वितरण व्यवस्था यांचे यशस्वी नियोजन हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक आहे. असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे डॉ.अरुण शिंदे यांनी काढले. 
 कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने एक मे रोजी गोकुळ प्रकल्प स्थळी कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे उपस्थित होते.
 चेअरमन अरुण डोंगळे म्‍हाणाले की, एखादी संस्था प्रगती पथावरती नेण्यासाठी त्या संस्थेच्या कर्मचाऱ्याचे योगदान फार महत्त्वाचे असते. तेथील कुशल कर्मचारी यांच्यामुळे संस्था बळकट होत असते. यावेळी कामगार दिनाच्‍या व महाराष्‍ट् दिनाच्‍या शुभेच्छा दिल्या.
 कार्यक्रमाला कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्‍ण पाटील, मार्केटिंग महा.व्यवस्थापक जगदीश पाटील, व्यवस्थापक वित्त हिमांशू कापडिया, हणमंत पाटील, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम,अध्यक्ष मल्हार पाटील, कॉ व्ही डी पाटील, कॉ लक्ष्मण पाटील, कॉ दत्ता बच्चे, कॉ संभाजी शेलार उपस्थित होते.