दिवाळी फराळ, भेटवस्तू देश-विदेशात पोहचवण्याची सुविधा
schedule07 Oct 25 person by visibility 170 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दिवाळी म्हटलं की आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना फराळ तसेच गिफ्ट्स पाठवणं ही परंपरा झाली आहे. आणि हे सर्व साहित्य वेळेत पोहोचणं यासारखं समाधान दुसरं काही नाही. या दिवाळीमध्ये देश विदेशात फराळ व भेटवस्तू पाठवण्यासाठी तेज कुरिअर मार्फत मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. तेज कुरिअर १९५५ पासून जगभरातील अनेक देशात अशा प्रकारे खात्रीशीर सेवा देत आहे. जलद, सुरक्षित आणि किफायतशीर कुरिअर म्हणून तेज कुरिअरचं नाव सुप्रसिद्ध आहे. अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर अनेकांचे नातेवाईक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत. त्यांनाही फराळ पाठवण्यासाठी अनेक कुटुंबांतून विचारणा होत आहे. अमेरिकेतील टॅरीफचा फराळाच्या वस्तूंवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी भांबावून नं जाता फराळ व भेटवस्तू पाठवाव्यात असं आवाहन तेज कुरिअरच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ. साधना घाटगे यांनी केलं आहे. अमेरिकेत फराळाच्या वस्तूंवर एक ते दहा किलोपर्यंत २५ डॉलर्स आणि अकरा ते वीस किलोपर्यंत ४० डॉलर्स ड्युटी आकारली जाते. त्याचा आणि टॅरीफचा काहीही संबंध नाही. यापूर्वी अमेरिकेत भारतातून पोस्टल सेवेमार्फत फराळाच्या वस्तू पाठवल्या जायच्या. आता पोस्टाची सेवा बंद झाल्यामुळे ग्राहक तेज कुरिअरच्या माध्यमातून या वस्तू अमेरिकेत पाठवू शकतात, असे प्रतिपादन सौ. साधना घाटगे यांनी केलं आहे.