+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustराजेश क्षीरसागरांच्या विजयासाठी जीवाचे रान करू -भाजपा पदाधिकाऱ्यांची ग्वाही adjustजिल्हा परिषद कृषी विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या adjustदीपावलीनिमित्त जिल्हा परिषदेला चार दिवस सुट्टी adjustडीवाय पाटील अभियांत्रिकीत एनपीटीईएल जागरूकता कार्यशाळा adjustविधानसभेसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक, सतेज पाटलांचा समावेश adjustबंडखोरीची भाषा करणारे वीरेंंद्र मंडलिक उतरले मुश्रीफांच्या प्रचारात, म्हणाले विजयासाठी जीवाचे रान करू adjustचंद्रदीप नरकेंचे शक्तीप्रदर्शन, जंगी रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल adjustकोल्हापुरात मनसेचे अनोख्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल adjustशाहू महाराजांनी सांगावं, माझं काय चुकलं ? राजेश लाटकर adjustराजेश लाटकर आमचा कार्यकर्ता, ते आमच्या सोबतच असतील ! उद्या त्यांची भेट घेणार !!
1001157259
1001130166
1000995296
schedule19 Jul 24 person by visibility 347 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
गजापूर  येथील हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संसारोपयोगी साहित्य व दहा लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली. आमदार राजेश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक  भैया माने, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली  पदाधिकाऱ्यांनी गावात जाऊन सलोखा निर्माण व्हावा या भावनेतून ग्रामस्थांशी संवाद साधला.पालकमंत्री हसन मुश्रीफही गावाला लवकरच भेट देणार असल्याचे सांगितले.         
आमदार राजेश पाटील म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी गजापूरसह विशाळगड घटनेमध्ये पीडित झालेल्या सर्वांना भेट दिली आहे. त्यांची विचारपूस केली आहे. त्याचबरोबर प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत. आज आम्ही राष्ट्रवादीच्यावतीने इथल्या हिंसाचारग्रस्त नागरिकांना मदत केली आहे. 
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, केडीसीसी बँकेचे संचालक सुधीर देसाई, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर, पैलवान रवींद्र पाटील, आर व्ही पाटील, अमित गाताडे, असिफ फरास, आदिल फरास, मनोज फराकटे, शिरीष देसाई, नितीन दिंडे, सतीश घाडगे, संजय चितारी उपस्थित होते. 
...................
एकाच घरात दोन वेगवेगळया भूमिका
  भैया माने म्हणाले, या सगळ्या प्रकारामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जाणीवपूर्वक टार्गेट केल जात आहे. रविवारी  ज्यादिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी आम्ही पहाटे पाच वाजताच कागलवरून निघून वेळापूर येथे पंढरपूर दिंडीच्या तिसऱ्या रिंगण सोहळ्यासाठी दिंडीमध्ये पोहोचलो होतो. हा दिंडीतील हा रिंगण सोहळा पूर्ण करून पालकमंत्री  मोटारीत बसल्यानंतर त्यांना कोल्हापुरातून फोन यायला सुरुवात झाली. त्यादिवशी आम्हीही सोबत होतो. त्या क्षणापासूनच श्री. मुश्रीफसाहेब अस्वस्थ होत गेले. त्यावेळी एक तर फोनला रेंज नव्हती. तसेच; तिथून पुढे दुपारी बारामतीला महासन्मान रॅलीचा मेळावाही होता. त्या क्षणाला तर तिकडून परत येऊन विशाळगडला जाणे शक्य नव्हते किंवा तशा वातावरणात तिथे जाणेही योग्य नव्हते. या दुर्दैवी घटनेमुळे दिवसभर चाललेली त्यांच्या जीवाची घालमेल आम्ही जवळून बघितली आहे. बारामतीमध्ये व्यासपीठावरसुद्धा ते सुन्न बसून होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे भाषण सुरू असताना सगळे प्रमुख मान्यवर उठून पुढे आले. परंतु मुश्रीफ पुढे आले नाहीत. फोनवरून ते कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात होते. आता काहीजण असा सवाल करतील की, मग दुसऱ्या दिवशी  तिकडे का गेले नाहीत ? कारण; त्या घटनेमुळे तिथे संचारबंदी लागू केली होती. संचारबंदी लागू असताना पालकमंत्र्यांनी तिथे जाणे हे दिसायलाही बरोबर दिसणारे नव्हती. आता कोणी म्हणेल काँग्रेसचे लोक एवढ्या लवकर तिथे कसे पोहोचले? त्यांना ते येणं गरजेचं होतं. कारण; वडिल आणि मुलगा अशा एकाच घरात दोन वेगवेगळ्या भूमिका निर्माण झालेल्या होत्या.