दिलबहार तालीम मंडळाचे सचिव विनायक माने यांचे निधन
schedule03 Feb 25 person by visibility 407 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रविवार पेठ येथील दिलबहार तालीम मंडळाचे सचिव विनायकराव आनंदराव माने ( वय ६१ वर्षे, रा. रविवार पेठ ) यांचे निधन झाले. रात्री ८.३० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित 2 मुले, एक मुलगी, दोन बहिणी, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता रक्षाविसर्जन आहे.
माने हे, 22 जानेवारी रोजी पन्हाळा येथे तालीम संस्थेच्या तातडीच्या कामकाजासंदर्भात दुचाकी वरून गेलेले होते. पन्हाळा येथून कोल्हापूरकडे परत येत असताना बुधवार पेठेच्या वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरात धडक माने यांच्या दुचाकीला बसली. दुचाकीवर मागे बसलेले माने हे रस्त्यावर पडले. त्याना गंभीर स्वरूपाची इजा झाली त्या दुचाकीचे वाहक अनिल पाटील हे ही या अपघातात जखमी झाले. तातडीने त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण तिथे त्यांच्या मेंदूला गंभीर स्वरूपाची इजा झालेने पुढील उपचारासाठी आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले तातडीने त्त्यांच्या मेंदूमध्ये झालेल्या रक्तस्त्रावावर मोठी शस्त्रक्रिया झाली. गेल्या काही दिवसापासुन त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. प्रकृतीमध्ये सुधारणा होत असताना त्यांची प्रकृती बिघडली. सोमवारी (तीन फेब्रुवारी) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.