सिने कलाकारांची टिटवे महाविद्यालयात धमाल, विद्यार्थिनींशी साधला संवाद
schedule23 Jul 24 person by visibility 408 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. कलाकार अंकित मोहन, नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांची प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमातील कलाकार सध्या सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. राधानगरी तालुक्यातील टिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाला या सिनेमातील कलाकारांनी भेट दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन मास मीडिया विभागाने केले होते. कलाकारांचे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आगमन होताच परिसर टाळया, शिट्टयांनी दुमदुमला. याप्रसंगी अंकित मोहनने टायटल साँगवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केला.अभिनेत्री स्मिता तांबेने सर्वांचं लक्ष वेधलं, विद्यार्थिनींशी संवाद साधला. बाबू सिनेमातील गाण्यांवर ठेका धरला. याप्रसंगी दिग्दर्शक मयूर शिंदे उपस्थित होते.
या सिनेमातील कलाकार व दिग्दर्शकांनी, सिनेमा निर्मिती, शूटिंग दरम्यानचे किस्से ऐकविले. उपप्राचार्य प्रा. सागर शेटगे यांनी प्रास्ताविक केले. तेजस्विनी परबकर यांनी सूत्रसंचालन केले. दिग्विजय कुंभार यांनी आभार मानले.