१९ जुलैपासून वाजणार डंका हरी नामाचा !
schedule03 Jul 24 person by visibility 347 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गणराज स्टुडिओज आणि रुद्र एंटरटेनमेंटस प्रस्तुत वेगळया कथानकावर आधारित ‘डंका हरी नामाचा’हा सिनेमा १९ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. निर्माते रवी फड आणि दिग्दर्शक श्रेयश जाधव यांच्या या सिनेमात मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा कसदार अभिनय पाहावयास मिळणार आहे.
मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती चोरीला जाते आणि पुढे जे नाट्य घडते ते या सिनेमात मांडले आहे. या सिनेमात अभिनेते अविनाश नारकर, सयाजी शिंदे आहेत. अभिनेते अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड हे महत्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा प्रेक्षकांना वेगळी अनुभूती देईल असे. वाई, गोवासह अन्य लोकेशनवर या सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे.
या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक श्रेयस जाधव, अभिनेता अनिकेत विश्वासराव, किरण गायकवाड, प्रियदर्शन जाधव हे कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी सिनेमाची बलस्थाने सांगितली. मनाची पकड घेणारे कथानक आहे. डंका हरी नामाचा या सिनेमाचे वेगळेपणे नावापासूनच आहे. हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास सिनेमातील कलाकारांनी व्यक्त केला.