डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय
schedule19 May 26 person by visibility 210 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सांगली येथे झालेल्या २० व्या कै. सौ. मीनाताई शिरगावकर स्मृती महिला खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, कोल्हापूरची विद्यार्थिनी महिमा मिलिंद शिर्के हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल तिला रोख रुपये १२,५००/- चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. महिमाच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे. जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन पोवार यांचे तिला मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार अशोक देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी यशाबद्दल अभिनंदन केले.