Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कार्यालयीन वेळेत शहर अभियंता गैरहजर, आयुक्तांकडून पगार कपात ! १९ कर्मचाऱ्यांवरही कारवाई! !प्रा. डॉ. आनंद पाटील यांचा चार डिसेंबरला नागरी सत्कार, २१०० पानांच्या तीन खंडांचे प्रकाशन मतदार यादीत निष्काळजीपणा नको, यंत्रणा सक्षम करा : आमदार क्षीरसागरांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचनाभारत येणाऱ्या काळात परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेल - डॉ एस महेंद्र देवतपोवन मैदानावर पाच डिसेंबर पासून सतेज कृषी प्रदर्शनकोल्हापूर चित्पावन संघातर्फे आपत्तीग्रस्तांना मदतचंद्रावर पाणी आहे हे जगात पहिल्यांदा भारताने शोधले - इस्त्रोतील शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. शर्माविभागीय माहिती कार्यालयात संविधान दिन साजराकास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे शिक्षक पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरणलिंगायत माळी समाजाचा चौदा डिसेंबरला  राज्यस्तरीय वधू वर मेळावा 

जाहिरात

 

आयुक्त के. मंजुलक्ष्मींचा धडाका ! ठेकेदार-कन्सल्टंटना नोटीसा, अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई !!

schedule25 Nov 24 person by visibility 412 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत कोल्हापूर शहरात रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी, रस्त्यांची कामांची पाहणी करुन  ठेकेदार एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड डेव्हलपर्स यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. देखरेख कामात हयगय केल्यामुळे अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.

 प्रशासकांना ठेकेदार मे.एव्हरेस्ट इनफ्रासस्ट्रक्चर ॲन्ड डेव्हलपर्स यांनी निविदेतील शर्ती व अटीनुसार आवश्यक बाबींची जसे साईट लॅब सुरु करणे, साईट ऑफिस सुरु करणे व इतर बाबींची पूर्तता केली नाही. बारचाट दिला नाही, डांबरीकरण करताना सेन्सर पेव्हरचा वापर केला नाही. त्यामुळे प्रशासकांनी पाहणी करताना कामाच्या जागेवर पंचनामा करुन त्या ठिकाणचे नमुने घेऊन ते मटेरियलचे गर्व्हन्मेंट  पॉलिटेक्निक कॉलेजला तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले. यामध्ये गुणवत्तेपेक्षा कमी प्रमाणात डांबरचे प्रमाण आढळले. यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेवरील प्रकल्प सल्लागार संदीप गुरव ॲन्ड असोसिएट्स यांनी दसरा चौक ते नंगीवली चौक या रस्त्याच्या कामावर ठेकेदारामार्फत मटेरियल टेस्टींगसाठी साईट लॅब, साईट ऑफिस व कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासणी करणे इत्यादी बाबींची तपासणी व पुर्तता केली नाही. साईटवर काम करताना सेन्सर पेव्हर नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणली नाही.  तसेच गेल्या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये साठ टक्के काम पूर्ण  करुन घेतले नसल्याने व बारचाट तयार केला नसल्याने या सल्लागार कंपनीला या कामावरुन कमी का करण्यात येऊ नये याबाबत नोटीस बजावली आहे.

.............................

अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातील कामाची 16 रत्यांचे कामे  मुदतीत, गुणवत्तापुर्वक व दर्जेदार करुन घेणे, कामावर देखरेख ठेवणेची जबाबदारी  शहर अभियंता यांची आहे. मटेरियल टेस्टींगसाठी साईट लॅब असणे, साईट ऑफिस करणे व या कामाचा बारचाट तयार करुन घेणे, कामाच्या जागेवर मटेरियलची तपासणी करण्याची जबाबदारी होती. यासाठी सल्लागार कंपनी व ठेकेदारांशी समन्वय ठेऊन सर्व बाबीची पुर्तता करुन घेणे गरजेचे होते. ही कामे झाली नसल्याने शहर अभियता नेत्रदिप सरनोबत यांना पाच हजार व  तत्कालीन शहर अभियंता तथा जल अभियंता हर्षजीत घाटगे यांना चार हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच कनिष्ठ अभियंता निवास पोवार हे दसरा चौक ते नंगिवली चौक या रस्त्यावर प्रशासक फिरती करताना साईटवर उपस्थित नसल्याने ३५००रुपये इतका दंड केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes