Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना पोलिस अधिकाऱ्याला पकडलेशेतकऱ्यांच्यासोबत पिठलं भाकरी, चिखलगुठ्ठा करुन भात रोपांची लागण ! एक दिवस बळीराजासोबत !!कोल्हापुरात दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा-मंत्री हसन मुश्रीफगोकुळमध्ये सहकार दिनानिमित्त विविध उपक्रम, बचत गटाच्या स्टॉलवर हजारोंची उलाढालशरद पवार पक्षाच्या मेळाव्याला हाऊसफुल्ल गर्दी !आगामी निवडणूक कार्यकर्त्यांची, आघाडीचे सर्वाधिकार जिल्हा पातळीवर हवेत !!सहकारातूनच मानवी जीवनाचा खऱ्या अर्थाने विकास : प्राचार्या वर्षा मैंदर्गीनूतन मराठी विद्यालय हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी हेरिटेजचे बळराज्यातील एमफिल प्राध्यापकांना न्याय, पंचवीस वर्षाचा प्रश्न निकालीमार्केट यार्डातील व्यापार-व्यावसायिकांची सामाजिक बांधिलकी, स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतकुंभार काम करणा-यांना महापालिकेचा परवाना आवश्यक

जाहिरात

 

कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे स्वच्छता अभियान

schedule02 Oct 24 person by visibility 311 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ( दि .२ ऑक्टोबर ) कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचालित शहाजी लॉ कॉलेज, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स , नाइट कॉलेज आणि पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या वतीने रत्नाप्पा कुंभार नगर ( आर के नगर ' येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खडीच्या गणपतीपासून आर के नगर सोसायट्यांमधील वसाहती, बाजारपेठ,रस्ते, चौक येथे स्वच्छता स्वच्छता करण्यात आली . आरकेनगर नाका येथील कोंडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा होता. हा परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. तसेच या परिसरामध्ये श्रमदान करून परिसर स्वच्छ व कचरामुक्त करण्यात आला . यासाठी रत्नाप्पा कुंभारनगर हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुनील वंदुरे पाटील, ग्रामपंचायत पाचगाव व मोरेवाडी तसेच या परिसरातील नागरिक यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले .
 कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ विश्वनाथ मगदूम यांनी महात्मा गांधींचे विचार व कार्यापासून आपण  प्रेरणा घेतली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहिमेचा उद्देश सांगितला. गतवर्षीपासून कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या महाविद्यालयांच्यावतीने आर के नगर परिसरात स्वच्छता व प्रबोधन केले जाते. यंदा सुमारे  पाचशे विद्यार्थी, एनसीसी, एनएसएसचे स्वयंसेवक, प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.
कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा  रजनी मगदूम, सचिव डॉ विश्वनाथ मगदूम यांच्या पुढाकाराने ही स्वच्छता मोहीम झाली. डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ . आर एस नाईक, नाइट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ . एस जे फराकटे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ कुलकर्णी आदी  उपस्थित होते . 
  "महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवून स्वच्छतेचे महत्व लोकमानसात रुजवण्याचा प्रयत्न करणार आहोत ", असे  डॉ मगदूम यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes