कोल्हापूर विभागीय क्रीडा संकुलला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ! पालकमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
schedule08 Jul 24 person by visibility 619 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय शासकीय क्रीडा संकुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव दिले जाणार आहे. याविषयीचा प्रस्ताव तातडीने शासनाला सादर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. या क्रीडा संकुलाच्या समस्यांचे निराकरण करून ते जास्तीत जास्त अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करू असेही पालकमंत्री म्हणाले.
दरम्यान हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे या विभागीय क्रीडा संकुलात दोन कुस्तीच्या मॅटचे आखाडे आहेत. मातीचाही आखाडा असावा, अशी मागणी केली. मुश्रीफ यांनी मातीच्या आखाड्याचीही तरतूद करण्याच्या सूचना केल्या.
या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, सुधाकर जमादार, अमर सासणे, प्रफुल पाटील आदी उपस्थित होते.
.