शहीदच्या विद्यार्थिनींची नाशिकमधील स्पर्धेत चमकदार कामगिरी
schedule29 Sep 25 person by visibility 118 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : एसएनडीटी मुंबई विद्यापीठ यांच्या अंतर्गत नाशिक येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथील विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करत खो-खो सामन्यात तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. कठीण प्रतिस्पर्ध्यांवर मात करत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी शिस्त, जिद्द व खेळाडूपणाचे दर्शन घडवले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाला गौरव प्राप्त झाला आहे. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, मुख्य मार्गदर्शक डॉ.जगन्नाथ पाटील,प्राचार्य प्रशांत पालकर यांनी संघाचे विशेष कौतुक करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या यशामागे महाविद्यालयाचे उपप्राचार्य सागर शेटगे, दिग्विजय कुंभार, अनिता अथने, प्रा. ओमकार बोगार यांनीही संघाला प्रोत्साहन दिले.