Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहीद शिक्षण परिवाराने दिले स्वप्नांना बळ, डोंगराळ भागातील मुलांनी केली यूपीएससी परीक्षा सरअभाविपतर्फे गुणवंत विद्यार्थी छात्र सोहळा उत्साहातसीपीआरमध्ये विनाछेद यशस्वी हृदयशस्त्रक्रिया लिंगायत समाजाचे रविवारी धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनमुख्यमंत्री महोदय !  विद्रूपीकरणाचे उद्घाटन करू नका, मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन ! ! सर्वपक्षीय शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा !  महापौर म्हणाल्या, साऱ्यांनी मिळून डी.वाय. पाटील यांचे स्मारक साकारू ! !गोकुळतर्फे दूध खरेदी- विक्री दरात वाढजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदेएआय मुळे जग बदलेल , बदलत्या जगासाठी माणसाने स्वतःला तयार करावे - आयटी शिक्षणतज्ज्ञ विवेक सावंतशिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखेंच्या स्मृतीदिनानिमित्त बालस्केटिंगपटूतर्फे स्मृतीज्योत

जाहिरात

 

जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे शाहू जयंतीदिनी रक्तदान शिबीर

schedule25 Jun 26 person by visibility 251 categoryआरोग्यजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद येथे रक्तदान शिबीर होणार आहे. यामध्ये रक्तदात्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे. कर्मचारी, नागरिक व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून २०० बॉटल रक्त संकलनाचे उद्दिष्ट आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या ब्लड बँकेत सध्या रक्ताचा तुटवडा आहे. यामुळे गरीब रुग्णांच्या उपचारात अडथळे येत आहेत. यामुळे  रक्तदान शिबिर भरविले आहे. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिबिरात संकलित झालेल्या रक्ताच्या बाटल्या सीपीआर ब्लड बँकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यप्रसंगी राज्याध्यक्ष सुबराव पवार, राज्यकोषाध्यक्ष सुनील बी. जाधव, राज्य सरचिटणीस शहाजी एकसिंगे, आनंदराव जाधव, प्रा. बी. जी. मांगले, विश्वनाथ कांबळे, प्रकाश जाधव, जयसिंग पाटील, अरुण मांगलेकर, मुबारक शेख उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes