Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शनमहिलांनी राजकीय साक्षर बनायला हवे –स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकरअवनितर्फे शुक्रवारी शिक्षण हक्क  परिषदक्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांना अभिवादनन्यू कॉलेजमध्ये साकारला आधुनिक ई कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओडीवाय पाटील कृषी अभियांत्रिकीचा विद्यार्थी बनला कृषी शास्त्रज्ञराष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत केआयटीच्या शाहू मानेला सुवर्णपदकअटलजींनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा अभिमान-आमदार सुधीर गाडगीळशिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठकशनिवारी शाहू स्मारकमध्ये रंगणार मंगलगाणी -दंगलगाणी संगीत मैफिल 

जाहिरात

 

अरुण डोंगळेंच्या ताकतीमुळे आबिटकरांना राधानगरीत मोठे बळ ! मुश्रीफ, चंद्रदीप नरकेंसाठीही जोडण्या !!

schedule25 Nov 24 person by visibility 113 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघांची निवडणूक यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. महायुतीतंर्गत शिवसेनेचे उमेदवार व आमदार प्रकाश  आबिटकर यांच्या विरोधात  राधानगरी तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व बडे नेते, बिद्री भोगावतीचे आजी-माजी संचालक, तालुक्यातील गोकुळचे तीन संचालक महाविकास आघाडीच्या बाजूला गेले.
राधानगरी तालुक्यात शिवसेनेचे आमदार आबिटकर एकाएकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची आमदार आबिटकर यांना भक्कम साथ दिली. डोंगळे गट, त्यांना मानणारा वर्ग यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आबिटकर यांच्या मताधिक्क्यात भर पडली. आबिटकर यांच्या विजयाच्या हॅट्रटिकमध्ये गोकुळचे चेअरमन डोंगळे यांचा वाटाही मोलाचा ठरला.

 कागल मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ, करवीरमध्ये चंद्रदीप नरके यांच्या विजयासाठीही डोंगळ यांनी जोडण्या लावल्या.   राधानगरीमध्ये डोंगळे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. समाजकारण, राजकारण, सहकार, दूध संस्था या माध्यमातून डोंगळे यांचे उत्तम नेटवर्क आहे. यामुळे या मतदारसंघात डोंगळे यांची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण ठरली आहे. राधानगरी –भुदरगड मतदारसंघात यंदा विधानसभेची निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनली होती. आमदार आबिटकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटातर्फे बिद्रीचे चेअरमन के. पी. पाटील यांनी शड्डू ठोकला होता. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यावर मतदारसंघातील वातावरण आरोप, प्रत्यारोपांनी ढवळले. राधानगरीतील मातब्बर मंडळी के. पी. पाटील यांच्या बाजूने झुकले होते.

दरम्यान डोंगळे यांनी आमदार आबिटकर यांची कार्यशैली, विकासाचा दृष्टिकोन आणि मतदारसंघासाठी काम करण्याचा झपाटा पाहून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आमदार आबिटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.  महायुतीच्या पाठीमागे आपली ताकद उभा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव असलेले त्यांचे सुपुत्र अभिषेक डोंगळे यांनीही आपले सहकारी आणि युवाशक्तीच्या सहकार्याने मतदार संघात प्रचाराचे रान उठवून आबिटकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

 चेअरमन अरुण डोंगळे हे गेली पस्तीस वर्षे गोकुळच्या सत्तेत आहेत. राधानगरी -भुदरगड मधील वाड्या वस्त्यावर त्यांनी शेकडो दूध संस्था स्थापन करून कार्यकर्त्यांची जाळे विणले आहे.एखाद्या निवडणुकीत भाग घेतला की झोकून देऊन काम करणे, पदरमोड करून उमेदवारासाठी यंत्रणा राबवणे, स्वतः उमेदवार समजून निवडणूक काळात अहोरात्र पायाला भिंगरी बांधून राबणे ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी आबिटकर यांना पाठिंबा दिला शिवाय अनेक ठिकाणी सभा गाजविल्या. मतदारसंघाच्या विकासासाठी आबिटकर हेच योग्य नेतृत्व आहे हे मतदारांवर बिंबविले. 

त्यांचे पुत्र अभिषेक डोंगळे यांच्या युवाशक्तीचे शेकडो कार्यकर्ते हे प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारात आघाडीवर होते. यामुळे  आबिटकर यांना राधानगरी मध्ये मताधिक्य मिळणे सुलभ झाले. २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविलेले व बिद्रीचे संचालक राहुल देसाई, बिद्रीचे संचालक  सत्यजित जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील, गोकुळचे संचालक किसन चौगुले, हे सर्वजण केपींच्या बाजूला गेले असतना डोंगळे यांनी आमदार आबिटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. गटाची संपूर्ण ताकत त्यांच्या पाठीशी उभी केली. प्रचारात स्वत; सहभाग घेतला आणि आमदार आबिटकर यांच्या विजयाला मोठा हातभार लावला.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes