अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा लढा अधिक तीव्र करणार - सतीशचंद्र कांबळे
schedule16 Mar 25 person by visibility 90 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी पुढे हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे म्हणाले, सर्व कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि युनियनने योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन तीन हजार रुपयांनी वाढलेले आहे. इतकी मानधन वाढ यापूर्वी कधीही झालेली नाही. परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा थांबवायचा नाही. आपल्या सर्व मागण्या नैतिकदृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या न्याय्य आहेत. त्यामुळे आपल्या सर्वच मागण्या निश्चितच मान्य होतील. यावेळी जयश्री पवार,कांचन मगदूम, उज्वला पाटील यांनी विचार मांडले.
या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. याप्रसंगी शुभांगी पाटील, वर्षा लव्हटे, पूजा पडळकर, भारती बोलाईकर,शोभा महाडीक, प्रतिभा कांबळे, जयश्री पवार, कांचन मगदूम, आक्काताई पाटील,बेबी बाटे, हेमा जाधव, संगिता पाटील,शोभा दुबले, मेघाराणी पाटील, मनिषा भोसले, सुनिता कुंभार,, प्रिया मांगलेकर, सुनिता जाधव,रेखा पाटील उपस्थित होते.