घोडावत इंटरनॅशनल स्कूलची अनन्या चव्हाणची क्रिकेट संघात निवड
schedule24 Sep 25 person by visibility 125 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अतिग्रे या ठिकाणी इयत्ता दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी अनन्या राहुल चव्हाण हिची महाराष्ट्र महिला अंडर-१९ संघात निवड झाली. बीसीसीआय अंतर्गत असणाऱ्या आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन अंडर-१९ महिला टी-२० आमंत्रित स्पर्धा २०२५-२६ मध्ये अनन्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. महाराष्ट्रातील उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू म्हणून तिची सगळीकडे ख्याती झाली आहे. ही स्पर्धा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आंध्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आल्या असून सर्व सामने एसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, मंगलगिरी (विजयवाडा) येथे होणार आहेत. तिच्या या निवडीबद्दल संस्थापक संजय घोडावत, विश्वस् विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच. एम. नवीन, डे बोर्डिंगचे प्राचार्य अस्कर अली, क्रीडा संचालक आय वाय केंचन्नावर यांनी अभिनंदन केले.