अजित पवार ११ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर ! नियोजनासाठी राष्ट्रवादीची रविवारी बैठक !!
schedule01 Aug 24 person by visibility 414 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार हे अकरा ऑगस्ट २०२४ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दोऱ्याच्या नियोजनासंबंधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रविवारी, चार ऑगस्ट रोजी बैठक होत आहे. श्री शाहू मार्केट यार्ड येथील पक्षाच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता नियोजनाची बैठक होईल.
या नियोजनाच्या बैठकीला जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आणि पदाधिकारी, जिल्हा सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी, विधानसभाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, नगरपालिका क्षेञ शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी,सहकारी संस्थांचे संचालक व पदाधिकारी, जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य महापालिका-नगरपालिकेचे सदस्य व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी केले आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील_आसुर्लेकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील, मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे संचालक युवराज पाटील, नाविद मुश्रीफ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप माने, शहराध्यक्ष आदिल फरास,विठठल चोपडे आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.