Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अंबाबाई देवीच्या मूर्तीवर दोन दिवस संवर्धन प्रक्रिया ! भाविकांना ११-१२ ऑगस्टला मूळ मूर्तीचे दर्शन नाही !!जज बबगोकुळच्या रक्षाबंधन परंपरेतून जपला वीस २० वर्षांचा ऋणानुबंध भाजप करणार महापालिकेसाठी ४५ जागावर दावा, काँग्रेसने जिंकलेल्या जागेवर लक्ष !आदिवासी एम्पलॉइज फेडरेशनतर्फे रविवारी आदिवासी दिनाचे आयोजनतिरंगा झळकतोय आमच्या शेतात-शक्तीपीठ नको आमच्या वावरात ! पंधरा ऑगस्टदिनी शक्तीपीठ विरोधात आंदोलनयुवाशक्ती दहीहंडीचा थरार २४ ऑगस्टला रंगणार, प्रथम क्रमांकाला ३ लाख रूपयांचे बक्षीस  28 ऑक्टोबरपासून कोल्हापूर -मुंबई नियमित विमानसेवा ! सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे दोन महिन्यात मुंबईपर्यंत धावेलगार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे सहा संस्थांना बीज राखीचे प्रशिक्षण स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पाहिला अवकारिका सिनेमा

जाहिरात

 

दूरशिक्षण केंद्राद्वारे उच्चशिक्षण घेऊन कालवा निरीक्षक बनल्या ऐश्वर्या बल्लाळ

schedule06 Aug 25 person by visibility 97 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थिनी ऐश्वर्या नामदेव बल्लाळ यांची  राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बल्लाळ यांनी एम.ए. (इतिहास) पदव्युत्तर शिक्षण दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून पूर्ण केले आहे. अभ्यासक्रमादरम्यान त्यांनी राज्य पात्रता परीक्षा तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांनी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्राप्त केली आहे. सध्या त्या शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागात डॉ. अवनीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "१८८५ ते १९८४ पर्यंतचा संविधानात्मक विकास आणि महिला" या विषयावर पीएच.डी. संशोधन करत आहेत.

या आधीही त्यांची स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी तसेच महसूल सहायक या पदांवर निवड झाली आहे. सध्या त्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. बल्लाळ म्हणाल्या, "बी.एस्सी. संख्याशास्त्र विषयातून पदवी घेतल्यानंतर मी शिक्षण थांबवले होते. परंतु स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान हे लक्षात आले की, दूरशिक्षणाच्या माध्यमातून अपूर्ण शिक्षण पूर्ण करता येते आणि स्पर्धा परीक्षेस उपयुक्त असणारे विषयही निवडता येतात. म्हणून मी इतिहास विषयातून एम.ए. पूर्ण केले आणि याच शिक्षणामुळे सेट-नेट आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता आले. या यशात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचा मोलाचा वाटा आहे." डॉ. मेघा गुळवणी म्हणाल्या, "दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र हे केवळ शिक्षणाचे माध्यम नाही, तर शिक्षणात खंड पडलेल्यांना मुख्य प्रवाहात पुन्हा आणून त्यांना कौशल्याधारित शिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे प्रभावी साधन आहे. श्रीमती बल्लाळ यांचा यशस्वी प्रवास हे त्याचे उत्तम उदाहरण आहे."

कार्यक्रमास केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, गणित अधिविभाग प्रमुख डॉ. मच्छिंद्र गोफणे, उपकुलसचिव व्ही.बी. शिंदे, सहायक कुलसचिव दिलीप मोहाडीकर, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, सहायक प्राध्यापक डॉ. मुफिद मुजावर, डॉ. नितीन रणदिवे, डॉ. सुशांत माने, विशाल हिलगे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes