+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम adjustशिवाजी विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम
1001157259
1001130166
1000995296
schedule02 Jul 24 person by visibility 236 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : भारतनगर झोपडपट्टी (साळोखे पार्कजवळ) या भागात अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या पथकाने दोन जुलै रोजी छापा टाकून अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनवर कारवाई केली. यावेळी घटनास्थळावर वजनकाटा, एक एच पी क्षमतेची मोटर, पाईप नोझल, तीन रिकामे दोन भरलेले १४ किलो वजनाचे घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर असा एकूण अंदाजे २५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 
  अवैध गैस रिफिलींग स्टेशन हे महंमद अल्लाबक्ष मकानदार ही व्यक्ती चालवत होती. त्याच्यावर आयपीसी कलम २८५ कलम २८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम तीन व पाच अन्वये राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकामध्ये पथक प्रमुख अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे -पाटील यांच्यासह पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम, भाऊसाहेब खोत व अक्षय ठोंबरे यांचा समावेश होता. 
या कारवाईबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले तसेच यापुढेही अशीच कारवाई करत राहण्याच्या सूचना दिल्या. ही वस्ती दाटीवाटीची असल्याने अवैध गॅस रिफिलिंग करताना काही दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित वित्तहानी होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडू शकतो, त्यामुळे शहरातील अशा अवैध गॅस रिफिलिंग स्टेशनची माहिती नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयात कळवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.