Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मनपास्तर शालेय क्रिकेट स्पर्धेत विवेकानंद कॉलेजला विजेतेपदनगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे 40 स्टार प्रचारक ! माजी मंत्री आमदार खासदारांचा समावेशहलगर्जीपणा चालणार नाही, वेळेत काम पूर्ण करा- डेडलाईन पाळा- अमल महाडिकांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभाजपा - नेते कार्यकर्त्यांचा ढोल ताशावर ठेकालंडनमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, डॉ. संजय पाटील, तेजस पाटलांनी साधला संवादगोकुळमध्ये सहकार सप्‍ताहनिमित्‍त चेअरमनांच्या हस्ते ध्‍वजारोहणप्रा. महेश साळुंखे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजज ददकोल्हापुरात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग रिंगसाठी ! धनंजय महाडिकांची सहकार्याची ग्वाही !! महापालिकेसाठी आरक्षण निश्चित, निवडणुकीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग ! इच्छुक लागले तयारीला !!

जाहिरात

 

समाजवादाचा सच्चा पाईक हरपला, प्रतापराव होगाडेंना काँग्रेस कमिटीत आदरांजली

schedule22 Nov 24 person by visibility 428 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
‘ सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करूण मत मांडणारा . समाजवादाचा सच्चा पाईक हरपला ’अशा शब्दांत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापतराव होगाडे यांना कोल्हापुरात काँग्रेस कमिटीत आदरांजली वाहण्यात आली. 

होगाडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली होती. यावेळी समाजवादी कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी  कॉम्रेड प्रताप होगाडे  यांच्या प्रतिमेला फुले वाहून  श्रध्दांजली वाहिली. महावितरणकडून शेतकऱ्यांवर वीज चोरी वीज गळतीची रक्कम लादली जात असल्याच पुराव्यासह दाखवून देणारे व्यक्तीमत्व म्हणजे प्रताप  होगाडे होय. समाजवादाचा सच्चा पाईक हरपला अशा भावना शिपूरकर यांनी व्यक्त केल्या.

 कॉम्रेड दिलीप पवार  शशांक बावचकर, कॉम्रेड अतुल दिघे, बाबासाहेब देवकर, प्रा टी एस पाटील ,
भारती पवार ,ॲड सुमेधा सबनीस, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, कॉम्रेड चंद्रकांत यादव,  राजेश लाटकर,  इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष .विक्रांत पाटील ॲड . बाबा इंदुलकर, कॉम्रेड शिवाजीराव परुळेकर,मिथिली होगडे  भारत लाटकर यांनी  दिवंगत प्रताप होगाडे यांचा जीवन प्रवास मांडला.

याप्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण,  सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, सरला पाटील, दीपा पाटील, जेनिस प्रताप होगाडे, भरत रसाळे,  कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव संजय पोवार - वाईकर, राजेंद्र मुठाणे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शेकापचे बाबुराव कदम, भारत पाटील भुयेकर, ॲड  सुरेखा सबनीस, चंद्रकांत पाटील, सुभाष शहापुरे, सचिन जमदाडे,  आर जी तांबे उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes