+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustगजापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसारोपयोगी साहित्याचे वाटप, दहा लाखाची आर्थिक मदत adjustएनआयटीचे विद्यार्थी तंत्रशिक्षण बोर्डाच्या परीक्षेत अव्वल adjustजरग विद्यामंदिरमध्ये नानासो जरग यांना श्रद्धांजली adjustकोल्हापुरात ट्रक महोत्सव उत्साहात ! चेतन मोटर्स - टाटा मोटर्सचा पुढाकार !! adjustबालिश नेत्याची मुलं विशाळगड आंदोलनात का नव्हती ? सतेज पाटलांचा खासदार महाडिकांना टोला adjustसदभावना रॅलीतून प्रकटला सामाजिक एकोप्यावरील विश्वास adjustशहरातील पाणी पुरवठासंबंधी भाजप नगरसेवकांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक adjustमहायुती, महाविकासला पर्याय परिवर्तन आघाडी ! पुण्यात विविध संघटना नेत्यांची बैठक !! adjustव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीवर आघाडीचा बहिष्कार ! कुलगुरुंच्यावर मनमानी कारभाराचा आरोप !! adjust४२ हजार वीज कंत्राटी कामगारांना न्याय कधी मिळणार ? राज्यभर आमरण उपोषणाचा इशारा
1000621806
1000615695
1000597139
1000567748
1000562876
1000551727
schedule03 Jul 24 person by visibility 156 categoryगुन्हे
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कौलव येथे जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकासह सहा जणांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादू त्यांना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2012 च्या कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य मांत्रिक हा कराडचा असून त्याचे साथीदार पुलाची शिरोली, कराड व पाटणचे आहेत. मांत्रिका कडून गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी देण्यात येणार होता अशी अफवा परिसरात पसरली होती. राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायत सदस्यांनी राधानगरी पोलिसांना फोन करून शरद धर्मा माने यांच्या घरी काही मांत्रिकांसह आघोरी कृत्य केले जात आहे, अशी माहिती देण्यात आली. राधानगरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शरद माने यांच्या घरावर छापा टाकले असता मांत्रिकासह पाच जण तिथे उपस्थित होते. देवघरात मोठा खड्डा पाडला होता. तिथे लिंबू व पूजेचे साहित्य होते .गुप्तधन शोधण्यासाठी पूजा केली जात होती असे मांत्रिक महेश सदाशिव काशीद याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी शरद धर्मा माने (वय ५२, रा.कौलव, ता. राधानगरी) महेश सदाशिव काशीद (मांत्रिक) (वय ४५ रा. राजमाचे, कराड जिल्हा सातारा), अशिष रमेश चव्हाण ( वय ३५,), चंद्रकांत महादेव धुमाळ ( वय ४०, दोघे राहणार मंगळवार पेठ कराड, जि. सातारा )संतोष निवृत्ती लोहार (वय ४२ रा. वाघोली ता. पाटण, जि. सातारा) कृष्णा बापू पाटील (वय ५५, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले )यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिंता 2023 कलम 351 ( 2), 3 (5) सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल केला आहे असे पत्र राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष गोरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.