Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव मानेयकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत झाले बरे पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी टीडीआरचा वापर, आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठकगोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवारजनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडे

जाहिरात

 

३०० गर्भपात, माजी सिव्हिल सर्जन पोलिसांच्या ताब्यात ! कोल्हापुरात हॉस्पिटलवर धाड !!

schedule30 Jul 26 person by visibility 834 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी पोलिस व आरोग्य विभागाने, गुरुवारी (३० जुलै २०२६) माजी सिव्हिल सर्जन डॉ. चंद्रकांत गुंडू गायकवाडला ताब्यात घेतले. कदमवाडी येथील त्याच्या प्रतिमा हास्पिटलवर छापा टाकून सोनोग्राफी मशिनसह साहित्यही जप्त केले. गर्भपातासाठी ठेवलेल्या गोळया, शस्त्रक्रियेची उपकरणे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. गायकवाडने गेल्या दोन वर्षात ३०० गर्भपात केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी पोलिसांनी दोन दिवसापूर्वी कळंबा येथील थ्री स्टार लॉजवर छापा टाकला होता. महिला एजंटाना अटक केली होती. चौकशीत एका एजंटाने, गर्भलिंग निदान केल्यावर गर्भपातासाठी कदमवाडी येथील डॉ. गायकवाडच्या हॉस्पिटलकडे पाठविल्याचे सांगितले. गायकवाड यांनी कदमवाडीतील भीमनगरमधील बंगल्यात प्रतिमा हॉस्पिटल सुरू केले होते. पोलिस व आरोग्य विभागाने डमी रुग्ण पाठवून सापळा लावला. गायकवाड त्या रुग्णाचा गर्भपात करण्यासाठी तयारी करत असताना पोलिस व आरोग्य विभागाने धाड टाकून ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शंकर कळकुटे, सुहास पोवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिस व  आरोग्य  विभागाच्या संयुक्त पथकाने हॉस्पिटलवर धाड टाकून गायकवाडला ताब्यात घेतले. तेव्हा गायकवाडने रक्तदाब व रक्तातील साखर वाढल्याने त्रास होऊ लागल्याचे सांगितले. तपासणीसाठी गायकवाडला छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. गायकवाड हा दहा वर्षापूर्वी आरोग्य विभागातून सहायक संचालक म्हणून निवृत्त झाला आहे. त्याने, प्रारंभीच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर, सोळांकूर, हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात काम केले आहे. पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, बीड येथे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून काम केले. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक होता. मुंबईत काम करत असताना गायकवाडवर  लाचखोरीचे आरोप होऊन निलंबितही केले होते अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes