राजेश क्षीरसागर यांना पितृशोक
schedule24 Mar 24 person by visibility 401 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांचे रविवारी (२४ मार्च) पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८८ वर्षाचे होते. विनायकराव क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, परतंवडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी, २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे आहे.