चित्रकर्मी क्रिकेट लीगला प्रारंभ, अभिनेत्री सुरेखा कुडचींची उपस्थिती
schedule12 May 26 person by visibility 229 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांना एकत्र आणणाऱ्या “चित्रकर्मी क्रिकेट लीग २०२६ – पर्व चौथे” या स्पर्धेला मंगळवारी सुरुवात झाली. कळंबा येथील कॅसल स्पोर्ट्स टर्फ येथे ही दोन दिवसीय स्पर्धा होत आहे. मंगळवारी, १२ मे २०२६ रोजी सकाळी दहा वाजता कॅमेरा पूजन करण्यात आले. उपमहापौर अक्षय जरग आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या हस्ते क्लॅप देऊन स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी वॉटर एटीएमचे अध्यक्ष रमेश चावरे, सर्वेश जाधव, ट्रॉफी व रोख रक्कम देणगीदार अमर मठपती, निर्मिती व्यवस्थापकसुनील चौगले, आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे तसेच दिग्दर्शक संदीप पाटील, अभिनेते स्वप्नील राजशेखर, आनंद यांची प्रमुख उपस्थिती होती.