अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
schedule08 Jul 24 person by visibility 470 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : दसरा चौक येथील अपंग पुनर्वसन संस्थेमार्फत गुणवंत व गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पायमल यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकां मध्ये विषद केला. प्रमुख पाहुणे मालोजीराजे यांनी दिव्यांगत्वाचा न्यूनगंड न बाळगता दिव्यांगत्त्वावर मात करीत परीक्षेत चांगले गुण प्राप्त केले बद्दल सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तुकाराम माळी तालमीचे अध्यक्ष संदीप चौगुले यांनी सर्व दिव्यांगाचे अभिनंदन केले. मालोजीराजे यांच्या हस्ते चाळीस दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे सेक्रेटरी बापूराव चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे कार्यकर्ते अजय वणकुंद्रे, वसंत कांबळे, विलास मोरस्कर, दत्तात्रय म्हामुलकर, सुधाकर पाटील, संजय पाटील, श्रीमती उमा पवार, प्रल्हाद मोरे, दिलीप वाईगडे, पांडुरंग देवणे, शोभा सावंत, प्रियंका कुराडे, चेतन अनुसे, मनोहर कांबळे उपस्थित होते.