+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई adjustपाचगाव, कळंबा, गांधीनगरसह सात ग्रामपंचायतींना नोटीसा adjust विधायक उपक्रमांनी प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस साजरा adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule02 May 24 person by visibility 142 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी (पाच मे २०२४)  कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. दसरा चौक येथे सकाळी अकरा वाजता रॅलीला प्रारंभ होईल. मुख्यमंत्री शिंदे या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ क्षीरसागर यांनी गुरुवारी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी बुधवारी गांधी मैदान येथे जाहीर सभा घेतली होती. त्या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर बोलताना क्षीरसागर म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची कास उद्धव ठाकरे यांनी सोडली. सत्तेसाठी ते काँग्रेस सोबत गेले. शिवसेनेचे जुने,कडवट, निष्ठावंत कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्यापासून का दुरावले ? याचा त्यांनी विचार करावा."
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर देशवाशियांचा विश्वास आहे. जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.