Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रा.जयसिंग सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार ! शंकरराव घाटगे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शुक्रवारी संस्कारसोहळा कार्यक्रम !!नवे सभागृह…नवे गटनेते, महापालिका राजकारणात लागणार कसोटी !करवीर निवासिनी गृहतारण सहकारी संस्थेचे उद्घाटन, सभासदांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल- जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे साधेपणाने होणार क्रिडाईच्या दालन प्रदर्शनाचा प्रारंभ विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, बारामतीत विमान कोसळले जिल्हा परिषदेसाठी 241 उमेदवार! पंचायत समितीसाठी 455 जण रिंगणात !! आबिटकर नॉलेज सिटीमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहातबोगस डॉक्टरमुक्त गावे जाहीर करा; जिल्हाधिकाऱ्यांचा आरोग्य विभागाला डोसअमृता डोंगळे, संग्राम कलिकते, पुनम पाटील यांना विजयी करु या,  हसन मुश्रीफांची मतदारांना साद       काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी इंद्रजीत बोंद्रे

जाहिरात

 

सतेज पाटील वारकऱ्यांच्या वेशभूषेत, कर्मयोगी महानाट्यात सहभाग

schedule06 Oct 24 person by visibility 372 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'कर्मयोगी' या महानाट्यात आमदार सतेज पाटील यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. 
कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आनंदा प्रित्यर्थ कसबा पावडर लाईन बाजारमधील तब्बल 2001 कलाकारांनी एकत्र येत पॅव्हेलियन मैदान येथे 'कर्मयोगी' हे महानाट्य सादर केले. यामध्ये तत्कालीन ग्रामीण जीवन, शेतकरी जीवन, महाराजांची न्यायव्यवस्था, वारकरी संप्रदाय आदी घटनांचे चित्रण करण्यात आले होते. यावेळी धनगरी ढोल वाजवण्यात आले. यामध्ये आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी ढोल वाजवून आनंद साजरा केला.  त्यानंतर या महानाट्यातील वारकरी दिंडीमध्ये आमदार सतेज पाटील हे स्वतः टाळ घेऊन सहभागी झाले. यावेळी तब्बल बालकलाकारांनी शिवाजी महाराजांच्या वेशभूशेत सहभाग घेतला.  या महानाट्यनंतर दोन्ही आमदारासह सगळे कलाकार मिरवणुकीने भगवा चौकात दाखल झाले. यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीने कसबा बावडा , लाईन बाजार परिसर उजळून निघाला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes