Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कागलमध्ये राजकीय घमासान, मंडलिक-मुश्रीफांत हल्लाबोलमेन राजारामच्या विजयी खेळाडूंची वाजतगाजत मिरवणूक ! स्वागताला अधिकारी !!महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्कात जागा मंजूर, पाच एकर जागा उपलब्धवारसा हा दगड विटांचा समूह नसून अस्मितेचे प्रतीक - नंदिता घाटगेकागलात नवे राजकारण,  मंडलिकांना आबिटकरांची ताकत ! मुश्रीफ-समरजितराजेंच्या आघाडीला आव्हान ! !ज्येष्ठांच्या हक्कासाठी मंगळवारी कोल्हापुरात सन्मानवारीकृतज्ञतेचा कृतीशील पाठ , शिक्षकांनी जमविला निधी! विद्यार्थ्यांची संकल्पना एक वही-एक पेनची ! !तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडस्ट्री रेडी इंजिनिअर प्रोग्रामउद्योजक रवींद्र माणगावे यांचा भाजपात प्रवेशसौंदत्ती यात्रेसाठी एसटी भाडे- खोळंबा आकारात विशेष सवलत : आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

आजारी पत्नीला पाहायला गेला नाही म्हणून पतीला मारहाण

schedule10 Jul 24 person by visibility 800 categoryगुन्हे

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,  कोल्हापूर: हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या पत्नीला लवकर पाहायला आला नाही म्हणून सासरा, मेव्हणा आणि नातेवाईकांनी पतीला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका हॉस्पिटलमध्ये घडली. 
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. फिर्यादी असिफ राजेसाब यंकची (वय 25 ,रा. बीडी कॉलनी जवळ सुशीलानंद रेसिडेन्सी) हे व्यापारी असून त्यांची पत्नी ममता हॉस्पिटल येथे उपचारास दाखल केले होते. असिफ यंकची पत्नीला पाहण्यास हॉस्पिटलमध्ये गेले असता सासरा महंमद युसुफ मकबूल (वय 55 )आणि मेव्हणा सोहेल मोहम्मद युसुफ मणेर (वय 27, पाचवी गल्ली, शाहूपुरी) यांनी असिफ यंकची याला पत्नीस लवकर बघण्यास का आला नाही म्हणून जाब विचारत दोघांसह अन्य नातेवाईकांनी आसिफला बेदम मारहाण केली. त्याच्या उजव्या पायावर एका वस्तूने जोरदार हल्ला केला असल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये असिफने दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes